बीड : पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sucide case

बीड : पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या

माजलगाव : पत्नीच्या गैर वर्तणुकीस व जाचास कंटाळलेल्या पतीने आत्महत्या पुर्वी व्हिडीओ क्लिप तयार करुन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ता.19 आँगस्ट घडली होती. या प्रकरणी मयताच्या वडीलाच्या फिर्यादीवरुन शहर पोलीसात पत्नी विरुद्ध आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत अधिक माहीती अशी की, गेवराई रोडवरील फुले पिंपळगाव शिवारातील मोकळ्या जागेवर पाल टाकुन राहत असलेल्या आकाश सुरेश मुळे(25)मुळ रा.बावणे पांगरी ता.बदनापुर जि.जालना या युवकाने ता,19 आँगस्ट ला जायकवाडी उजवा कालवा गेट क्र.10 ला गळफास घेवून आत्महत्या केली होती. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद झाली होती.

माञ मयत आकाशने आत्महत्या करण्या पुर्वी मोबाईल वर व्हिडीओ क्लिप तयार करुन ती नातेवाईकांच्या मोबाईलवर व्हायरल केली असल्याचे उघडकीस आल्याने नातेवाईकांनी सोमवारी शहर पोलीस ठाणे गाठत सदर क्लिप शहर पोलीसांना दाखवत दोषीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.यावरुन पोलीसांनी मयताचे वडील सुरेश मुळे यांच्या फिर्यादीवरुन पत्नी मंदा आकाश मुळे विरुद्ध आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Beed Husband Commits Suicide Wife Torture Video Clip Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..