बीड : अवैध गर्भपातप्रकरणी पाच जणांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beed illegal abortion case Crime against five

बीड : अवैध गर्भपातप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

बीड : अवैध गर्भपातानंतर महिलेच्या मृत्यू प्रकरणात पाच जणांविरुद्ध पिंपळनेर पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला. यात मृत महिलेचा पती, सासरा, भाऊ, एजंट महिला, खासगी परिचारिकेचा समावेश आहे. सीताबाई ऊर्फ शीतल गणेश गाडे (वय ३०, रा. बक्करवाडी, ता. बीड) हिचा गर्भपातानंतर अतिरक्तस्रावामुळे रविवारी मृत्यू झाला होता. शीतल गाडे यांना तीन मुली असून चौथ्यांदा त्या गर्भवती होत्या. अचानक रक्तस्राव सुरू झाल्याने पहिल्यांदा त्यांना खासगी, तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

उत्तरीय तपासणीत १८ आठवड्यांचा गर्भपात झाल्याचे, गर्भशयाशी छेडछाड झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तिचा पती, भाऊ, सासरा, एंजट महिला, लॅबचालक यांना ताब्यात घेतले होते. खासगी परिचारिका फरारी होती. त्यानंतर काल रात्री उशिरा पती गणेश गाडे, सासरा सुंदरराव गाडे, भाऊ नारायण निंबाळकर, एजंट मनीषा सानप, खासगी परिचारिका सीमा डोंगरे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक महादेव ढाकणे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली.

एजंट महिला पूर्वी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होती. सेवेचा राजीनामा दिल्यानंतर तिने असली कामे सुरू केली. यातून तिने कोट्यवधींची माया जमवली आहे. पोलिस, आरोग्य विभागाने तिच्या घरी केलेल्या तपासणीत सोनोग्राफीसाठी लागणारे लिक्विड, गर्भपाताच्या गोळ्या, इतर उपकरणे आढळली आहेत. रोख २८ लाख ३६ हजार रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली.

अवैध गर्भपात प्रकरणाच्या मुळाशी जाण्याबरोबरच एजंट महिलेच्या माध्यमातून बेकायदा गर्भलिंगनिदान, गर्भपात करणाऱ्या साखळीचा शोध घेण्यात येईल. पीसीपीएनडीटी कायद्यानुसार दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध दवाखाना परवाना रद्द करणे, फौजदारी गुन्हा, वैद्यकीय पदवी निलंबन अशा कठोर कारवाया केल्या जातील.

- डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

Web Title: Beed Illegal Abortion Case Crime Against Five

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BeedcrimeSakalabortion
go to top