Beed : पथकाने पकडून दिले अन् दोघे पोलिसांच्या हातून पळाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beed illegal business Accused absconding from local police

Beed : पथकाने पकडून दिले अन् दोघे पोलिसांच्या हातून पळाले

बीड : पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध धंदे, जुगार, बेकायदा दारु विक्री, गुटख्याची विक्री होताना काणाडोळा नवा नाही. मात्र, पथकाने कारवाई करुन ताब्यात दिलेल्या आरोपींनाही स्थानिक पोलिस सांभाळू शकले नाहीत. पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुटख्यासह पकडून दिलेले दोघे पेठ बीड पोलिसांच्या तावडीतून पळाल्याची घटना समोर आली आहे. पळालेल्या दोघांवर आता पळून जाण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जुगार, अवैध दारु विक्री, पत्त्यांचे क्लबसह गुटखा माफियागीरी जोरात असते. मात्र, स्थानिक पोलिसांचा काणाडोळा असल्याने वाढत्या अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. मागच्या काही दिवसांपासून पथक जुगार अड्ड्यांवर छापे मारुन कारवाया करत आहे. अशीच कारवाई या पथकाने शनिवारी (ता. २७) पेठ बीड पोलिस ठाणे हद्दीत केली.

शहरातल्या मोमीनपुरा भागात पिकअप (एम. एच. २० सी. टी. ३५१७) मधून गुटखा जात होता. पिकअपमधला आठ लाख ८२ हजारांचा गुटखा व शेख मोहसीन शेख सलाउद्दीन (वय २८, रा. खाजा नगर, मोमीनपुरा बीड) व शेख एकबाल शेख रशीद (रा. बार्शी रोड, बीड) या दोघांनाही ताब्यात घेऊन गुटख्यासह आरोपींना पेठबीड पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, पेठ बीड पोलिसांच्या ताब्यातून या दोन माफियांनी पळ काढला. विशेष पथकप्रमुख सहायक पोलिस निरीक्षक विलास हजारे यांच्यासह पथकाने गुटखा व माफिया पकडण्याची कारवाई केली होती.

Web Title: Beed Illegal Business Accused Absconding From Local Police Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..