
बीडः येथील जिल्हा कारागृहात धर्मांतरासाठी कैद्यांवर दबाव टाकला जात आहे. त्यासाठी त्यांना विविध अमिषे दाखविली जात असल्याचा आरोप अॅड. राहुल आघाव यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांचे अशील असलेले अमोल भावले, महेश रोडे, मोहसीन पठाण हे तिघे बंदी असताना त्यांच्याबाबत घडलेल्या प्रकारांची आघाव यांनी कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मेलवर तक्रार केल्याचा दावाही त्यांनी केला.