
घरी परतत असताना उजवा कालवानजिक येता अचानक बैल उधळली
जातेगाव (जि बीड)- मोहाचा तांडा (ता गेवराई) येथील शेतकरी बैलगाडी घराकडे परतत असताना अचानक बैलगाडी उजव्या कालव्यात पडल्याने बैलजोडीचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
गेवराई तालुक्यातील जातेगाव अंर्तगत मोहाचा तांडा येथील शेतकरी मनोहर राठोड शेतातील कामे उरकून सायंकाळी मुलगा बैलगाडी घेऊन घराकडे जात होते. घरी परतत असताना उजवा कालवानजिक येता अचानक बैल उधळली. बैलगाडी हाकणाऱ्या शेतक-याच्या मुलाच्या हाती असलेला कासरा सैल होता यामुळे बैलासह गाडी रस्त्याच्या कडेच्या उजव्या कालव्यात पडली.
Crime News: किरकोळ कारणावरून उदगीरात एकाचा खून
मुलाने उडी मारुन स्वतःचा जीव कसाबसा वाचवला. बैलगाडी पाटात पडल्याने त्याने आरडाओरडा केला. परंतु लोकं येण्यास उशिरा झाला. यामुळे गाडीसह बैलजोडीचा कालव्यात पाणी असल्याने जोत्याचा फास लागुन बुडुन मृत्यू झाला. दरम्यान शेतकऱ्याची एक लाख रुपये किमंतीची बैलजोडी बुडून मृत्यू झाल्याने जातेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
(edited by- pramod sarawale)