esakal | हद्द झाली! कोविड सेंटरमधून पळाला अन् बस स्थानकात गेला नाश्ता करायला, त्यानंतर....
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

शहरातील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या कोविड तपासणी सेंटरमधून, पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाने काही वेळेसाठी रुग्णालयाच्या बाहेर पलायन केले...

हद्द झाली! कोविड सेंटरमधून पळाला अन् बस स्थानकात गेला नाश्ता करायला, त्यानंतर....

sakal_logo
By
Team eSakal

किल्ले धारूर (बीड):  शहरातील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या कोविड तपासणी सेंटरमधून, पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाने काही वेळेसाठी रुग्णालयाच्या बाहेर पलायन केले. तो रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर कोरोना सेंटरमध्ये नेण्यासाठी व्यवस्था नसल्याने वेळ लागत असल्याने त्याला तेथेच ताटकळत बसावे लागले. खूप वेळ झाला तरीही व्यवस्था होत नसल्याचे पाहून अक्षरशः कोविड रुग्णाने बस स्थानकाकडे पलायन केले.

धारूरच्या कोविड तपासणी केंद्रात कर्मचारी स्टाफ अतिशय अपुरा आहे. येथे डॉक्टर देखील कमी प्रमाणात आहेत. याचाच फायदा रुग्णाने घेतला आणि त्याने पलायन केले. काही वेळानंतर त्याचा शोधाशोध घेऊन त्याला सापडून आणले खरे परंतु हा रुग्ण चक्क बस स्थानकावर काही नागरिकांनी पाहिला. तो हॉटेलमध्ये गेला त्याने नाष्टाही केल्याचे काही नागरिकांनी पाहिले.

'पोटाला चिमटा घेणाऱ्यांना जनता माफ करणार नाही', संभाजी पाटील निलंगेकर...

आरोग्य यंत्रणा एवढी कशी निष्काळजी असू शकते असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. पाणी पिण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे यातून मात्र कोरोनाचा प्रसार झाला नाही का अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आज कोविड रुग्ण चक्क रुग्णालयातून पलायन करत असतील तर याला जबाबदार कोण? नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणावर आहे हे काही समजेनासे झाले आहे.

Corona Updates: लातुरात कोरोनाचा कहर! २४ तासांत ९६९ नवीन रुग्ण

धारूर येथील आरोग्य विभागात पूर्ण स्टॉप भरावा रिक्त असलेले वैद्यकीय अधिकारी नर्स व इतर स्टाफची पूर्तता करावी तसेच कोवीड सेंटरला आवश्यक तेवढा स्टॉप द्यावा जेणेकरून अशा घटना पुन्हा होणार नाही, अशी मागणी धारूर येथील नागरिकांतून होत आहे. 

loading image