esakal | बीड-जालना महामार्गावर कापसाच्या वेअर हाऊसला आग; आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न

बोलून बातमी शोधा

fire}

सोशल मीडियावर आगीचे व्हिडीओ शेअर केले जात आहेत, त्यातून या आगीची भीषणता कळत आहे

बीड-जालना महामार्गावर कापसाच्या वेअर हाऊसला आग; आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

बीड: बीड जिल्ह्यात बीड-जालना महामार्गावर कापसाच्या वेअर हाऊसला भीषण आग लागली. यामध्ये लाखोंचा कापूस जळून खाक झाला आहे. ही आग रात्री बारा वाजता लागली होती. सकाळी दहा वाजेपर्यंत म्हणजे तब्बल दहा तासानंतरही ही आग आटोक्यात आली नव्हती. 

ही आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री बारापासून अग्नीशामक दलाचे प्रयत्न सुरु आहेत. ही आग बीडपासून जवळ असलेल्या जप्ती पारगावातील कापसाच्या शासकीय वेअर हाऊसला लागली होती. या वेअर हाऊसमध्ये शासनाने खरेदी केलेला कापूस ठेवला होता.

लस घेतलेले बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह

आगीचं कारण अजून समजू शकलं नाही. पण आगीची भीषणता ऐवढी होती की जिल्ह्यातील जवळपास चाळीस अग्निशमन विभागाचे बंब आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते पण आग आटोक्यात येत नव्हती. 

हिंगोलीत रस्त्याने विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांचा चाप, संचारबंदीचा दुसरा दिवस

सध्या आगीचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोशल मीडियावर आगीचे व्हिडीओ शेअर केले जात आहेत, त्यातून या आगीची भीषणता कळत आहे.