
या घटनेची माहिती समजताच शहरात एकच खळबळ उडाली आहे.
केज (बीड): शहरातील अल्लाउद्दीन नगरलगत वाहणाऱ्या लेंडी नदीत कुजलेल्या अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला आहे. शनिवारी (ता.०६) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह दिसला. या घटनेची माहिती समजताच शहरात एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील भीमनगर लगतच्या स्मशानभूमी जवळून वाहणाऱ्या लेंडी नदीच्या पात्रात हा मृतदेह आढळला आहे. अंदाजे पंचेचाळीस वर्ष वयाच्या अनोळखी पुरुषाचे प्रेत पालथ्या अवस्थेत पाण्यावर तरंगत होते. शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
केंद्र सरकारच्या बँकांच्या खासगीकरण धोरणविरोधात निदर्शने
शहरातील युन्नूस शेख व गुलाब गुंड हे दोघे दुपारी शेतात गेले असता त्यांना नदीच्या पात्रात मृतदेह पाण्यात तरंगाताना दिसला. त्यांनी याची माहिती केज पोलिस ठाण्याला कळविताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, रुक्मिणी पाचपिंडे, आशा चौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील आय-बाईक विभागाचे कर्मचारी वैभव राऊत व पप्पू अहंकारे हे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
महाविकास आघाडीकडून सरकारच्या पेट्रोल- डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन
त्यानंतर प्रेत पाण्याच्या बाहेर काढण्याचा पोलिस प्रयत्न करत असून त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवून ही घटना घातपात की अपघात आहे, याची माहिती पोलिस तपासानंतर समोर येणार आहे. या घटनेची शहरात माहिती समजताच एकच खळबळ उडाली आहे.
(edited by- pramod sarawale)