बीडमधील महेंद्रवाडी शिवारात विहिरीत बुडून बिबट्याचा मृत्यू

beed bibtya
beed bibtya

डोंगरकिन्ही(बीड): येथून जवळच असलेल्या महेंद्रवाडी परीसरात विहीरीत बुडून बिबट्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. महेंद्रवाडी शिवारातील स. नं. २१ मधील सार्वजनिक विहिरीत बुधवारी (ता. २४) महेंद्रवाडीचे वैजिनाथ राजपुरे, बापुराव राजपुरे, बापुराव लवांडे यांना सकाळी विहीरीत हा बिबट्या आढळला. त्यांनी पो. पा. खंडु शिंदे व वन विभागाचे सत्तार शेख यांना माहिती दिली.

यानंतर वन विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी सायमा पठाण तसेच वन्यजीव संरक्षण विभागाचे अजय देवगुडे यांची टीम महेंद्रवाडीत दाखल झाली होती. सदरील बिबट्या विहिरीतून बाहेर काढला असता मृत असल्याचे आढळून आले. हा १० ते १५ महिने वयाचा नर बिबट्या होता. मंगळवारी सायंकाळी या बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याचाअंदाज आहे. बिबट्याच्या अंगावर जखमा असून विहीरीतील खेकड्याने या जखमा केल्याचा अंदाज आहे.

दरम्यान सोमवारी रात्री उशिरा गारमाथ्याच्या घाटात काही प्रवाशांना बिबट्याचे दर्शन झाले होते. तो हाच का असे अंदाज ग्रामस्थ लावत आहेत. हे बिबट्याचे पिल्लू असुन नर-मादी ही नजिकच असू शकतात. अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तसेच अवघ्या तीन फुटांवर पाणी असलेल्या विहीरीत बिबट्या बुडाला कसा हाही प्रश्न आहे. जिल्हा पशुशल्यचिकीत्सक डॉ. विजय चौरे, डॉ. श्रीहरी उगलमुगले, डॉ. बळीराम राख यांनी शवविच्छेदन केले असून ते अहवाल सादर करतील. परिसरात अशी घटना पहिल्यांदाच झाली आहे.

हा बिबट्या वयाने लहान असून एक तर शिकार न मिळाल्याने उपाशी असावा अथवा आजारी असावा त्यामुळे त्याला  विहीरीतून पोहुन बाहेर येता आले नाही- सिद्धार्थ सोनवणे, वन्यप्राणी पक्षीप्रेमी शिरूर (कासार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com