esakal | 'आम्ही कमी पडलो.. आता लॉकडाउन शिवाय पर्याय नाही', धनंजय मुंडेंची कबूली

बोलून बातमी शोधा

dhanajay munde

-कोरोना विषयक आढावा बैठक

- ऑक्सीजनच्या एक हजार खाटा वाढविणार

- कठोर भूमिकेचे यंत्रणेला निर्देश

'आम्ही कमी पडलो.. आता लॉकडाउन शिवाय पर्याय नाही', धनंजय मुंडेंची कबूली
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बीड: कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव रोखण्यात आणि उपाय योजना करण्यात यंत्रणा म्हणून आम्ही कमी पडल्याची कबूली देत लोकांनीही अजिबात काळजी घेतली नाही असे सांगत आता कात झटकून कामाला लागण्याच्या सुचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या.

ऑक्सिजनच्या अडीच हजार खाटा असून आणखी लवकरच एक हजार खाटा वाढविल्या जातील. रुग्णांना खाटा, रेमडीसेव्हर इंजेक्शन, ऑक्सीजन कमी पडणार नाहीत असा विश्वासही देत यासाठी यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. 

Covid-19| 'गरज नसताना रेमडेसिव्हिर दिल्यास कारवाई'

सोमवारी (ता. १२) श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना उपाय योजनांची आढावा बैठक झाली. आमदार सुरेश धस, लक्ष्मण पवार, नमिता मुंदडा, बाळासाहेब आजबे, संजय दौंड, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, उपविभागीय अधिकारी श्रीमती नम्रता चाटे आदींची उपस्थिती होती.

रुग्णसंख्या अटोक्यात आल्याने लोखंडीच्या रुग्णालयातील बेड संख्या कमी करण्यात आली. आता या ठिकाणी बेड संख्या व ऑक्सीजन बेडसंख्या तातडीने वाढविण्यात येईल. तालुका स्तरावर मंगल कार्यालये किंवा तत्सम आस्थापना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने ताब्यात घेऊन तिथे विलगिकरण कक्ष स्थापन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. गरजेनुसार खासगी रुग्णालयेही ताब्यात घेण्यात येतील. बीडमध्ये विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळा लवकरच उभारली जाणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.

ऑफलाईन परीक्षार्थींचे भवितव्य अधांतरी, ‘लॉकडाऊन’मुळे होऊ शकते अडचण

तशांवर कठोर भूमिका; हलगर्जी करणाऱ्यांची गय नाही-
दरम्यान, कोरोना विषयक नियम पाळणे सर्वांची जबाबदारी आहे. लोक बऱ्या बोलाने ऐकत नसतील तर कठोर भूमिका घ्या, असे निर्देशही मुंडेंनी यंत्रणेला दिले. तर, रुग्णांच्या व्यवस्थापणापासून ते इतर सर्वच बाबींमध्ये प्रशासकीय व्यक्तीकडून हलगर्जीपणा झाल्याचे उघड झाल्यास त्यावर कार्यवाही करू, असा इशाराही त्यांनी दिला.

लॉकडाऊनच पर्याय अन्यथाएका सरणावर २५ लोकांचा अंत्यविधी-
कोरोना विषाणू संसर्गबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. नुकतेच नऊ लोकांचा एका सरणावर अंत्यविधी झाला. लॉकडाऊन केला नाही तर एका सरणावर २५ लोकांचा अंत्यविधी करावा लागेल, असेही धनंजय मुंडे म्हणाले.