esakal | अंबाजोगाईतील दांपत्याचा अमेरिकेमध्ये गूढ मृत्यू; चार वर्षांची मुलगी मात्र सुरक्षित
sakal

बोलून बातमी शोधा

indian couple dead in america

येथील दांपत्याचा अमेरिकेत गूढ मृत्यू झाला. घरी त्यांचे मृतदेह आढळले

अंबाजोगाईतील दांपत्याचा अमेरिकेमध्ये गूढ मृत्यू; चार वर्षांची मुलगी मात्र सुरक्षित

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अंबाजोगाई (बीड): येथील दांपत्याचा अमेरिकेत गूढ मृत्यू झाला आहे. राहत्या घरी त्यांचे मृतदेह आढळले आहेत. त्यांची चार वर्षांची मुलगी मात्र सुरक्षित आहे. दांपत्याच्या घातपाताची चर्चा येथील नागरिकांत होत आहे. 

शहरातील मोंढा परिसरातील किराणा मालाचे व्यापारी भारत रुद्रवार यांचा मुलगा बालाजी रुद्रवार (वय ३२) हा अमेरिकेतील न्यू जर्सीमधील अर्लिंग्टन येथे स्थायिक झाला होता. त्यांच्यासोबत पत्नी आरती, चार वर्षांची मुलगी विहा राहत होती.

Coronavirus| रेमडेसिव्हिरची जबाबदारी रुग्णाची की रुग्णालयाची?

बुधवारी (ता. ७) सायंकाळी विहा ही गॅलरीत रडत उभी होती. संशय आल्याने शेजारच्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी पाहणी केली असता बालाजी व आरतीचा मृतदेह आढळला.

भारतीय वेळेनुसार गुरुवारी (ता.८) सकाळी नऊला अमेरिकन पोलिसांनी दूरध्वनीद्वारे भारत रुद्रवार यांना यासंदर्भात माहिती दिली. विहा ही शेजाऱ्यांकडे सुखरूप आहे.

Corona Updates: चिंताजनक! लातुरात एका दिवसात रुग्णसंख्येने केला हजारी टप्पा पार

भारत रुद्रवार यांनी आमदार नमिता मुंदडा, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामार्फत परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अमेरिकेतील दूतावासाशी संपर्क साधला. मात्र रुद्रवार दांपत्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. 

loading image