Success story: रिक्षाचालकाचा मुलगा चालवणार मेट्रो ट्रेन! अडचणींवर मात करत प्रणवने गाठले यशाचे शिखर

प्रवीण फुटके
Friday, 12 February 2021

शहरातील भीमनगर येथील इंजिनिअर प्रणव वैजनाथ बनसोडे याची मुंबई मेट्रो मध्ये ट्रेन पायलट म्हणून निवड झाली आहे

परळी (बीड): शहरातील भीमनगर येथील इंजिनिअर प्रणव वैजनाथ बनसोडे याची मुंबई मेट्रो मध्ये ट्रेन पायलट म्हणून निवड झाली आहे. अत्यंत कमी वेळेत आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये इंजिनिअर प्रणव बनसोडे याने मुंबई मेट्रो या विभागाची तयारी केली होती आणि त्याच्या जिद्दीला, कष्टाला शेवटी फळ मिळाले आहे.

शहरातील भीमनगर भागातील प्रणव बनसोडे या युवकाची मुंबई मेट्रो मध्ये पायलट म्हणून निवड झाली असून प्रणवने अत्यंत गरिबीच्या परिस्थितून मार्ग काढत आपले शिक्षण पूर्ण केले आहे. प्रणवचे वडील वैजनाथ बनसोडे शहरात रिक्षा चालवून आपला घरगाडा चालवतात. अशा परिस्थितीत त्यांनी प्रणवला इंजिनिअर केले. प्रणवने आपल्या आर्थिक परिस्थितीवर मात करत वडीलांच्या विश्वासास पात्र ठरत मेहनत करुन शिक्षण पूर्ण केले.

अतिवष्टीचे सव्वासहा कोटी परत जाण्याच्या मार्गावर; बहुभूधारक शेतकऱ्यांना लाभ...

शालेय शिक्षण मिलिंद विद्यालयामध्ये बारावीपर्यंत व औरंगाबाद येथे शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पदवी प्राप्त मेट्रोची अवघड परीक्षा उत्तीर्ण केली. शिक्षणामध्ये त्यास इंजिनियर राजू जगतकर, प्राचार्य श्री जगतकर यांची अनमोल मदत केली. प्रणवने अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्याचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याने दाखवून दिले की जर आपल्यामध्ये जिद्द, चिकाटी व मेहनत करण्याची तयारी असेल तर आपण या जगामध्ये काहीही मिळवू शकतो. असा नवीन आदर्श त्याने भीमनगरमधील विद्यार्थ्यांपुढे घालून दिला आहे.

टिक टॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पंकजा मुंडेंची राज्य सरकारकडे...

प्रणवच्या यशाबदल त्याच्या आई वडिलांना आनंद व अभिमान वाटत आहे. प्रणव बनसोडेच्या यशाबद्दल मामा प्रा.डॉ. जगतकर, शंकर साळवे, प्रमोद जगतकर, प्रा.बालाजी जगतकर, अशोक जगतकर, वसंत बनसोडे, वैजनाथ सावंत, प्रताप समिंदरसवळे, प्रतीक केदारी, राज जगतकर, प्राचार्य शिरीष जगतकर, प्रमोद जगतकर, प्रताप समिंदर सवळे, राज जगतकर, प्राचार्य शिरीष जगतकर यांनी अभिनंदन केले आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed latest news Success story Rickshaw drivers son run metro train