

बीड - मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदु राहिलेल्या बीड जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपाची संख्याही राज्यात सर्वाधिक आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल एक लाख ८७ हजार ३१५ प्रमाणपत्रांचे वितरण केले आहे. जिल्हांतर्गत उपविभाग अंतर्गत वाटपात बीड विभागात सर्वाधिक ७० हजारांवर प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे.