

Lek Ladki Scheme
esakal
बीड : लेक लाडकी योजनेत जिल्ह्यात १७ लाखांहून अधिक रकमेचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. या प्रकाराची महिला व बालविकास आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून, जिल्हा परिषदेला कारणे दाखवा नोटीस बजावली. यावर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने अजब उत्तर देत तांत्रिक त्रुटीमुळे ३५९ लाभार्थी मुलींच्या खात्यावर दुबार निधी वितरीत झाल्याचे सांगितले.