Beed Lockdown| बीडमध्ये ३१ मे पर्यंत कडक लॉकडाउन वाढवला

कालावधी वाढवला; रेशन, कृषी दुकानांना सहा तासांची वेळ
beed lockdown
beed lockdownbeed lockdown

बीड: जिल्ह्यासाठी दहा दिवसांच्या कडक लॉकडाउनचा (lockdown) कालावधी संपत आलेला असतानाच तो वाढविण्यात आला आहे. मंगळवारच्या (ता. २५) मध्यरात्रीपासून ३१ मे पर्यंत कडक लॉकडाउन लागू असेल, असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले. या काळात स्वस्त धान्य व कृषी दुकाने खुली ठेवण्यासाठी सहा तासांचा कालावधी देण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी (second wave of covid 19) लाट थोपविण्यासाठी दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा झाली. त्याची मुदत २५ मे रोजी संपत होती. आता ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला. भाजीपाला, फळे विक्रीसाठी सकाळी सात ते नऊ अशी सवलत देण्यात आली आहे. अन्य आस्थापना सुरू राहणार नाहीत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. औषधांची दुकाने, दवाखाने, निदान क्लिनिक, लसीकरण केंद्रे , वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकीय आणि साहाय्यक उत्पादन, वितरण युनिट तसेच त्यांचे डीलर्स, वाहतूक, पुरवठा साखळी, लसींचे वितरण, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकीय उपकरणे, कच्चा माल युनिट आणि सहाय्य सेवा, पेट्रोल पंप, पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने, टपाल सेवा सुरु राहील.

beed lockdown
दिलासादायक! दोन वर्षात एकदाही गाठला नाही धरणांनी तळ

दूध विक्री, भाजीपाला वेळ-
दूध विक्री सकाळी सात ते दहा तर हातगाडीवरून भाजीपाला विक्रीस सात ते नऊ ही वेळ असेल. गॅस वितरण दिवसभर सुरु राहील. बँक व ग्राहक सेवा केंद्र यांचे कामकाज प्रत्येक दिवशी सकाळी १० ते दुपारी एक पर्यंत सुरु राहील. दरम्यानच्या काळात एटीएम कॅशच्या वाहनांना परवानगी असेल. दुपारी एक ते पावणेपाचपर्यंत बँक कर्मचाऱ्यांना केवळ अंतर्गत कामकाजासाठी मुभा असेल. शासकीय कार्यालये नियमित वेळेप्रमाणे सुरु राहतील, असे आदेशात म्हटले आहे.

रेशन, कृषी दुकानांची वेळ-
सुरवातीला दुकानदारांचा संप असल्याने मे महिन्याचे स्वस्त धान्य वितरण रखडले होते. २१ मे पासून स्वस्त धान्य वितरण सुरळीत सुरु असले तरी मे महिन्याचे धान्य वाटप उद्दिष्ट पूर्ततेसाठी आता सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत त्यांना वेळ वाढवून देण्यात आली आहे. पावसाळा तोंडावर असल्‍याने शेतकऱ्यांना कृषी साहित्य खरेदी करता यावी यासाठी कृषी दुकानांना सहा तासांची वेळ देण्यात आली आहे.

लॉकडाउन कालावधीत निर्बंध असलेल्या आस्थापना सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या सील करून परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल.
-रवींद्र जगताप, जिल्हाधिकारी, बीड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com