Beed Lockdown: बीड जिल्ह्यात कडक लॉकडाउन जाहीर

जिल्हाधिकारी जगताप यांनी आज आदेश काढून याची माहिती दिली आहे
beed lockdown
beed lockdownbeed lockdown
Updated on

बीड: जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाला आळा बसत नसल्याने पुन्हा पाच दिवसांचा (शनिवार, ता. आठ ते बुधवार, ता. १२ पर्यंत) कडक लॉकडाउन (lockdown in beed) जाहीर करण्यात आला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र जगताप (ravindra jagtap) यांनी शुक्रवारी (ता. सात) याबाबतचे आदेश काढले.

या पाच दिवसांमध्ये किराणा, मांस विक्री, बेकरी तसेच कृषीशी संबंधित दुकानेही पूर्णपणे बंद राहणार आहेत. दवाखाने, औषधी दुकाने, विमा कार्यालये, पेट्रोलपंप मात्र सुरु राहतील. गॅस वितरण दिवसभर सुरु ठेवण्यास मुभा असेल तर फिरुन दुध व फळ - भाज्यांची विक्री सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत करता येईल.

beed lockdown
'मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाप्रश्नी पंतप्रधान, राष्ट्रपतींकडे बोट दाखवू नये'

सायंकाळी पाच ते सात या वेळेत फिरून फळांची विक्री करता येईल. बँकेचे कामकाज केवळ अंतर्गत कामासाठी तसेच शासकीय काम आणि पेट्रोल पंप व गॅस एजन्सी चालकांच्या व्यवहारासाठी सकाळी १० ते १२ या वेळेत सुरू असेल. या बंद काळात कोणतेही दुकाने सुरु असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते सील करण्यात येईल, असेही रवींद्र जगताप यांनी आदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bribe Demand for Running Spa Center Lands Police Personnel in ACB Net
Kaigaon Gambling Racket Exposed in Police Raid at Local Eatery
Beed News
Beed News
Marathi News Esakal
www.esakal.com