'मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाप्रश्नी पंतप्रधान, राष्ट्रपतींकडे बोट दाखवू नये'

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मेटे यांच्या पुढाकाराने येथी काल बैठक झाली
vinayak mete
vinayak metevinayak mete
Updated on

बीड: मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) किंवा राष्ट्रपतीकडे बोट दाखवून वेळकाढूपणा करू नये, आरक्षणाचा (maratha reservation) विषय निष्क्रियपणे हाताळणाऱ्या अशोक चव्हाण (ashok chavan) यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी (ता. सात) केली.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मेटे यांच्या पुढाकाराने येथी काल बैठक झाली. त्यानंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. समाजातील मुलांचे शैक्षणिक, नोकरीसंदर्भातील भविष्य अंधकारमय झाले असून त्याला केवळ आघाडी सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन व संघर्ष कायम राहील. समाजाला काय आणि कसा न्याय देणार, आरक्षण कसे देणार, सोयी-सवलती काय देणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, असे निवेदनात म्हटले आहे.

vinayak mete
Osmanabad Lockdown: जिल्ह्यात पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर; जाणून घ्या कोणत्या सुविधा सुरू राहतील

मेटे यांच्यासह सुधीर काकडे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बी. बी. जाधव, अॅड. मंगेश पोकळे, गंगाधर काळकुटे, सुहास पाटील, राजेश भुसारी, डॉ. प्रमोद शिंदे, अनिल घुमरे, संजय पवार, मनोज जाधव, अशोक सुखवसे, विनोद कवडे, शेषेराव तांबे, विजय सुपेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com