
Beed Latest News: विधानसभा निवडणुकीत बीडच्या माजलगाव मतदारसंघात अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या बाबरी मुंडेंनी भलेही बंड केलं होतं तरी, बाबरी मुंडे हे पंकजा मुंडेंनीच उभा केलेला चेला होता अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. कारण बाबरी मुंडे आणि त्यांचे वडील राजाभाऊ मुंडे हे मुंडे कुटुंबीयांशी किती एकनिष्ठ आहेत हे सबंध बीड जिल्हा जाणतो. पण आता तेच बाबरी मुंडे त्याच मुंडे कुटुंबाशी फारकत घेऊन प्रकाश सोळंकेंच्या राजकीय आश्रयाला जाताहेत. असं असलं तरी त्यांची धनंजय मुंडेंशी जवळीक असणार नाहीये. ते आमदार सोळंकेंकडेच जात आहेत, त्यामागे काही राजकीय गणितं आहेत.