Beed News : स्कॉर्पिओ, स्विफ्टमधून आले संशयित साहित्य; ११९ संशयित अटक, फुटेजमधून आणखी १५० जणांची ओळख

मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून मोठमोठ्या नेत्यांची घरे, अस्थापना टार्गेट करण्याचे नियोजन काही मंडळींनी केल्याचे समोर आले
Maratha Reservation
Maratha ReservationSakal

बीड : शहरात सोमवारी (ता.३०) झालेल्या जाळपोळ व दगडफेकीच्या घटनांना आंदोलनातील उत्स्फूर्ततेएवढीच पूर्वनियोजनाची किनार पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. जाळपोळ आणि तोडफोडीचे साहित्य दोन वाहनांतून आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. एक काळी स्कॉर्पिओ आणि स्विफ्ट डिझायर कारमधून हे साहित्य बीडमध्ये आल्याचे समोर आले आहे. त्यात कुसळंब (ता. पाटोदा) येथील पोलिसांचे कनेक्टिव्हिटी टॉवरही या घटनांपूर्वीच जाळल्याने या पूर्वनियोजनावर शिक्कामोर्तब झाले आहे.

दरम्यान, दोन टप्प्यांतील हिंसक घटनाप्रकरणी दाखल एकूण २० गुन्ह्यांत पोलिसांनी आतापर्यंत ११९ संशयितांना अटक केली आहे. तर, फुटेजच्या माध्यमातून या घटनांतील सहभागी असणाऱ्या आणखी १५० संशयितांची ओळख पोलिसांनी पटविली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ जागोजागी आंदोलने सुरू होती.

मात्र, शनिवार (ता.२८ ऑक्टोबर) पासून हिंसक घटना घडू लागल्या. यात सोमवारी (ता.३०) जिल्ह्यात नेत्यांच्या घरांना, कार्यालयांना तसेच इतर प्रतिष्ठानांना आग लावणे व दगडफेक केल्याप्रकरणी जिल्ह्यात १५ गुन्हे नोंद झाले आहेत. तर, तत्पूर्वी शनिवार व रविवारच्या अशाच घटनांप्रकरणी पाच गुन्हे नोंद झाले आहेत.

या गुन्ह्यांत पोलिसांनी २७५ संशयितांची ओळख पटविली आहे. आता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची संख्या ११९ वर पोचली आहे. संशयितांची विचारपूस आणि पोलिसांचा तपास यातून अनेक बारकावे आणि धक्कादायक बाबी समोर येत आहेत.

मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून मोठमोठ्या नेत्यांची घरे, अस्थापना टार्गेट करण्याचे नियोजन काही मंडळींनी केल्याचे समोर आले आहे. त्यांची नावेही पोलिसांना मिळाली असली तरी प्रमुख मंडळींनी मोबाइल बंद करून बाहेर पळ काढला आहे.

दरम्यान, आंदोलनात ज्वलनशील पदार्थांचा वापर केला. बाटल्यांमध्ये व पाऊचमध्ये पेट्रोल, रॉकेलसह इतर ज्वलनशील पदार्थ होते. ज्या ठिकाणी पूर्ण सिमेंटीकरण आहे अशा ठिकाणी दगडांचा खच आढळला. या मंडळींकडे रॉड, कांबी अशा लोखंडी वस्तू होत्या. आंदोलकांकडे असे साहित्य असण्याचे काहीच कारण नाही.

मात्र, आंदोलनाचाच फायदा उठवत अशा प्रकारचे प्लॅनिंग केलेली मंडळींनी यात शिरकाव केला आणि हा सगळा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. अशा संशयास्पद सर्व वस्तू एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ जीप व पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून बीडला आल्याचे तपासातून समोर आले आहे.

तसेच, पुढे असणाऱ्या दुचाकींचे क्रमांकही पोलिसांच्या हाती लागले आहेत. नियोजनबद्ध पद्धतीने संशयित वस्तू वाहनांतून आणून गर्दीत पुरविणे, पोलिसांचे टॉवर कनेक्टिव्हिटी टॉवर जाळणे, ठराविक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक करणे, आग विझविता येऊ नये यासाठी पाण्याचे पाइप फोडणे, यामुळे आंदोलनापेक्षा अशा हिंसक घटना करणेच यातील एका गटाचे पूर्वनियोजन होते, यावर पोलिसांचेही शिक्कामोर्तब झाले आहे.

नुकसानीच्या पाहणीबरोबर पुराव्यांचा शोध

संचारबंदी उठल्यानंतर पोलिसांकडून संशयितांची धरपकड आणि नुकसानीची पाहणी असे दुहेरी काम पोलिस करत आहेत. जाळपोळ केलेल्या ठिकाणी नुकसानीच्या पाहणीबरोबरच पुराव्यांचाही शोध पोलिस घेत आहेत.

तपासात पोलिसांना दोन्ही वाहनांचे क्रमांक िमळाले आहेत. दोन्ही वाहने िजल्ह्यातील आहेत. नुकसानीची पाहणी आणि पुरावे शोधले जात आहेत. फुटेज व फोटोच्या माध्यमातून संशयितांची अोळख पटवली जात आहे. िवनाकारण कोणालाही त्रास िदला जाणार नाही.

— नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक, बीड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com