Beed News: बीडमधील माता-बालसंगोपन रुग्णालय सुरू होईल कधी? आठ वर्षांनीही वाट पाहावी लागते!
Beed’s Mata-Bal Sangopan Hospital: बीडमधील माता-बालसंगोपन रुग्णालय १०० खाटांसह महिला आणि बालकांसाठी तयार आहे. ऑक्सिजन पाइपलाइन, लिफ्ट व शस्त्रक्रियागृह अपूर्ण असल्यामुळे कार्यान्वित होणे उशिरा होत आहे.
बीड: महिला व बालकांसाठी स्वतंत्र रुग्णालय असावे यासाठी २१ कोटी रुपये खर्च करुन आठ वर्षांपूर्वी हाती घेतलेल्या माता - बालसंगोपन रुग्णालयाची इमारत दोन वर्षांपूर्वी बांधून पूर्ण झाली. मात्र, रुग्णालय कार्यान्वित झालेले नाही.