Beed Politics
sakal
मराठवाडा
Beed Politics: मातब्बरांचा हिरमोड, नव्या समीकरणांचा उदय; बीडमध्ये नगराध्यक्षपद अनुसूचित महिलेसाठी राखीव, युतीच्या चर्चांना उधाण
Beed News: नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाल्याने बीडमध्ये राजकीय समीकरणे बदलली आहेत. गटबाजी आणि विरोधी पक्षातील संताप स्पष्टपणे दिसून येतो.
बीड : नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाल्याने अनेक मातब्बरांचा हिरमोड झाला आहे. आरक्षणामुळे महायुती आणि महाविकास आघाडीची समीकरणे बदलली असून बीडमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादीत गटबाजी निश्चित मानली जात आहे. खरी पंचाईत युतीमधील भाजप, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेसची झाली आहे.

