esakal | कार्यालयात साप घुसला अन् कर्मचाऱ्यांची उडाली घाबरगुंडी, कामकाज दिवसभर बंदच
sakal

बोलून बातमी शोधा

Beed Ashti Sneak News

पण, या सापाचा ठावठिकाणा लागू शकला नाही. सापाच्या दहशतीमुळे एकाही कर्मचाऱ्यांचे कार्यालयात प्रवेश करण्याचे धारिष्ट झाले नाही.

कार्यालयात साप घुसला अन् कर्मचाऱ्यांची उडाली घाबरगुंडी, कामकाज दिवसभर बंदच

sakal_logo
By
अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी (जि.बीड) : येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात शनिवारी (ता.१३) सकाळी साप घुसल्याने कर्मचाऱ्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. सर्पमित्राला पाचारण शोध घेतल्यानंतरही तो सापडू न शकल्याने शनिवारी कार्यालयाचे कामकाज दिवसभर बंद राहिले.  येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात तालुका आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या प्रवेशद्वारातून शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मोठा साप जाताना काही तरुणांनी पाहिले. यानंतर कर्तव्यास हजर होण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना तरुणांनी ही बाब सांगितल्यानंतर कर्मचाऱ्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली.

यानंतर सर्पमित्र सीताराम टेकाडे यांना पाचारण करण्यात येऊन त्यांच्यामार्फत सर्व कार्यालयाची दोन वेळा पाहणी करण्यात आली. पण, या सापाचा ठावठिकाणा लागू शकला नाही. सापाच्या दहशतीमुळे एकाही कर्मचाऱ्यांचे कार्यालयात प्रवेश करण्याचे धारिष्ट झाले नाही. यामुळे कार्यालयीन कामकाज दिवसभर बंदच राहिले. रविवारी (ता. १४) सुटी असल्याने कामकाज बंदच असते. सोमवारी पुन्हा सर्पमित्रास बोलावून कार्यालयात घुसलेल्या सापाची शोधमोहीम राबविण्यात येणार असून, त्यानंतरच कामकाज सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.

संपादन - गणेश पिटेकर

loading image
go to top