Beed News: विनायक मेटे यांच्या पुतण्याची आत्महत्या; गळफास घेऊन जीवन संपवलं

vinayak mete brother son sachin mete
vinayak mete brother son sachin mete

बीड- शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुतण्याने आत्महत्या केली आहे. सचिन मेटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीये. विनायक मेटे यांचे बंधू त्र्यंबक मेटे यांचे सचिन मेटे हे पुत्र आहेत. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत. ( Beed News vinayak mete brother son sachin mete died by hanging police investigating )

सचिन मेटे यांनी त्यांच्या गावी एका झाडाला लटकून आत्महत्या केल्याचं सांगितले जाते. ते ३४ वर्षांचे होते. आत्महत्येची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. सचिन मेटे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस याप्रकरणात तपास करत आहेत. सचिन मेटे यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

vinayak mete brother son sachin mete
विनायक मेटे : मराठा आरक्षणासाठी लढणारे नेतृत्व

सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. आत्महत्येमागे काही वेगळे कारण आहे का? याबाबत पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे यांचा १४ ऑगस्ट २०२२ रोजी अपघातात मृत्यू झाला होता. मेटे घराण्यातील आणखी एका मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंवीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com