
शासकीय योजना ह्या भ्रष्टाचार करणाऱ्यांसाठी एक कुरणच बनल्या आहेत. अशा योजनांमध्ये भ्रष्टाचार हा मुद्दा काही नवा नाही. अनेकदा खोटी कामे दाखवणं, खोटे लाभार्थी दाखवणं किंवा योजनांचे पैसे बोगस खात्यांमध्ये वळवणे अशा वेगवेगळ्या पद्धती वापरून भ्रष्टाचार करण्यात येतो. आता बीडमध्ये एक धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. उडपी हॉटेलमध्ये शिवभोजन थाळीचं अनुदान लाटण्यासाठी एकाच थाळीसमोर ५० जणांना बसवून फोटो काढले जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. बीडमधील शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या उडपी हॉटेलमधला शिवभोजन थाळीच्या घोटाळ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.