

schoolgirl (from a Zilla Parishad school in Kesapuri, Parbhani area, Beed district, Maharashtra) emotional letter to Deputy Chief Minister Ajit Pawar
esakal
Parbhani zp school girl viral letter : बीड जिल्ह्यातील परभणी केसापुरी गावातील जिल्हा परिषद शाळेतील एका शाळकरी मुलीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलेले पत्र सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाला हात घालत आहे. "दादा, आम्हाला शिकायचंय की आयुष्यभर ऊसतोड मजूरच राहायचं?" असा काळीज पिळवटून टाकणारा प्रश्न या चिमुरडीने उपस्थित केला आहे. हे पत्र केवळ एका मुलीचे नसून ते ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या अंधकारमय भविष्याबद्दलचा एक मोठा आक्रोश आहे. आपल्या पालकांसोबत दरवर्षी ऊसतोडणीसाठी स्थलांतर करावं लागणाऱ्या या मुलांची शिक्षणाची आबाळ या पत्रातून प्रकर्षाने समोर आली आहे.