Beed Accident: बीडमध्ये पोलिस कारच्या धडकेत दुचाकीस्वारचा मृत्यू
Fatal Accident in Beed: Young Biker Hit by Police Vehicle: बीड, पाटोदा: पोलिसाच्या कारने दुचाकीस्वार तरुणाला धडक दिली, घटनास्थळी मृत्यू झाला. ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. चालक पळून गेला; पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
बीड : पोलिसाच्या मालकीच्या कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. अतुल श्रीराम घरत (२३, रा. महाजनवाडी, ता. बीड) असे त्याचे नाव आहे. दासखेड फाटा (ता. पाटोदा) येथे रविवारी (ता. २३) ही घटना घडली.