बीड पोलिस आत्महत्या, जळगावच्या ब्लॅकमेलर तरुणीला कोठडी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 December 2019

बीड येथील तरुण पोलिस शिपाई दिलीप केंद्रे यांनी स्वतःवर गोळी झाडू आत्महत्या केली. या प्रकरणात केंद्रे यांना ब्लॅकमेल करणारी जळगावची तरुणी पूजा पाटील हिला अटक करून न्यायालयात हजर केले. तिला चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाला. तिचा साथीदार पोलिस उमेश पवार फरारी आहे. 

बीड - येथील पोलिस शिपाई दिलीप केंद्रे यांच्या आत्महत्याप्रकरणी बीड पोलिसांनी जळगाव येथून पूजा गुलाब पाटील या तरुणीला बुधवारी (ता. 18) ताब्यात घेऊन गुरुवारी (ता. 19) अटक केली. या प्रकरणातील तिचा साथीदार पोलिस उमेश सुरेश पवार फरारी आहे. दरम्यान, पूजा पाटील हिला चार दिवसांची म्हणजे 22 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

पूजा पाटील व उमेश पवार यांच्याकडून वारंवार ब्लॅकमेलिंगला कंटाळून दिलीप प्रकाश केंद्रे या तरुण पोलिस शिपायाने मंगळवारी (ता. 17) डोक्‍यात सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती.

क्‍लिक करा : माझ्या पप्पाचा पगार वाढवा ना, चिमुकलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र   

केंद्रे यांच्या खिशात आढळलेल्या सुसाईड नोटवरून पूजा गुलाब पाटील व पोलिस कर्मचारी उमेश सुरेश पवार यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, आरोपींच्या अटकेसाठी बीड पोलिसांचे पथक बुधवारी जळगावला पोचले. त्यांनी पूजा पाटील हिला ताब्यात घेतले. मात्र, तिला मदत करणारा जळगाव पोलिस दलातील उमेश पवार फरारी आहे. पूजाला गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता 22 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा  :  ‘कल्याण’ बुकीवर आयजींचा छापा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed police commit suicide, Jalgaon blackmailer detained