
बीड, ता. ११ : जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासह गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून कठोर कारवायांचा धडाका सुरूच आहे. आणखी एका चोरट्यांच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नऊ महिन्यांतील मकोकाची (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) ही सहावी मोठी कारवाई आहे. नेकनूर पोलिस ठाणे हद्दीतील लिंबागणेश शिवारातील ओटू पॉवर पवनचक्कीतील कॉपर वायर चोरीप्रकरणी प्रकरणातील ही टोळी आहे.