

Seven Spa Centres Raided In Beed As Police Investigate Suspected Illegal Activities And Question Customers
sakal
बीड : शांत समजल्या जाणाऱ्या बीड शहरात स्पा सेंटरच्या गोंडस नावाखाली सुरू असलेल्या अश्लील आणि संशयास्पद प्रकारांविरोधात पोलिसांनी थेट सर्जिकल स्ट्राईक केला आहे. शहरातील विविध भागांतील तब्बल सात स्पा सेंटरवर बुधवारी (ता.३०) पोलिसांनी एकाच वेळी अचानक छापे टाकून अनेक महिला आणि पुरुष ग्राहकांना ताब्यात घेतले. या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर व्यवसाय चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून संपूर्ण बीड शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.