Beed News: पोलिस भरतीतील गैरप्रकार समोर आणणाऱ्याचा मृतदेह आढळला, घातपाताचा नातेवाइकांचा आरोप, बारा तास ठिय्या

Beed Police Recruitment Scam : धाराशिव पोलिस भरतीतील खेळाडू कोट्यातील कथित बोगस प्रमाणपत्रांचे रॅकेट उघड करणारा खेळाडू वैभव चव्हाण याचा बीडमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. त्याचा मृत्यू घातपात असल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला
Vaibhav Chavan, who exposed alleged fake sports certificates in the police recruitment process, was found dead in Beed.

Vaibhav Chavan, who exposed alleged fake sports certificates in the police recruitment process, was found dead in Beed.

esakal

Updated on: 

बीड: धाराशिव पोलिस भरती (२०२४-२५) मधील खेळाडू कोट्यातील बोगस प्रमाणपत्रांचे मोठे रॅकेट पुराव्यानिशी उघडकीस आणणारा, सात वर्षांपासून पोलिस भरतीची तयारी करणारा खेळाडू वैभव चव्हाण (रा. नवगण राजुरी, ता. बीड) याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवारी बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इमामपूर परिसरात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत वैभवचा मृतदेह आढळला. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...