
बीड : एका क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली सुरू असलेला जुगार अड्डा बीड ग्रामीण पोलिसांनी कारवाईत उघड केला. अभिनव क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली एका इमारतीत जुगार अड्डा चालवला जात होता. या ठिकाणी ग्रामीण पोलिसांच्या छापा मारत २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.