Beed News: २९ वर्षांचा दुष्काळ संपला! एसपी नवनीत काँवत यांच्या नेतृत्वात बीड पोलिसांचा ऐतिहासिक विजय; पटकावली जनरल चॅम्पियनशिप

Beed Police Create History With 349 Points at Sports Meet: एसपी नवनीत काँवत यांच्या नेतृत्वात बीड पोलिसांची ऐतिहासिक बाजी; १९९७ नंतर पहिल्यांदाच मानाचा चषक
Beed Police Sports Victory 2026 SP Navneet Kanwat Leads Team to Historic General Championship After 29 Years

Beed Police Sports Victory 2026 SP Navneet Kanwat Leads Team to Historic General Championship After 29 Years

esakal

Updated on: 

बीड : क्रीडा क्षेत्रात जेव्हा संघप्रमुख स्वतः मैदानात उतरून खेळाडूंचा उत्साह वाढवतो, तेव्हा इतिहास घडतोच. बीड पोलीस दलाच्या बाबतीतही नेमके हेच घडले आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी स्वतः मैदानात उतरून खेळत संघाचे मनोबल उंचावल्याने, तब्बल २९ वर्षांनंतर बीड पोलीस दलाने परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद (जनरल चॅम्पियनशिप) पटकावत ऐतिहासिक बाजी मारली आहे. १९९७ नंतर पहिल्यांदाच बीड पोलिसांनी या मानाच्या चषकावर आपले नाव कोरले असून, यजमानपद भूषवताना मिळवलेला हा विजय पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरला आहे.

Loading content, please wait...