

Beed Reels Star Ganesh Dongare Dies In Accident
Esakal
बीडमध्ये ट्रॅक्टर ट्रॉली अंगावरून गेल्यानं ऊसतोड कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. ऊसतोड कामगाराचं नाव गणेश डोंगरे असं असून तो रीलस्टारही होता. जेव्हा घटना घडली तेव्हा गणेशची पत्नी अश्विनी फेसबुक लाइव्ह करत होती. तिच्या डोळ्यादेखतच ही दुर्घटना घडली. तिला लक्षात आलं तेव्हा लाइव्हमध्येच ती किंचाळल्याचंही ऐकू येतं.