
बीडः महाराष्ट्र शासनाने विक्रीस बंदी घातलेल्या रेस्पिफ्रेश टीआर कफ सिरपचा साठा बीड जिल्ह्यात सापडला असून औषध प्रशासनात खळबळ उडाली. पुण्यातील एका वितरकाकडून बीडमधील दोन एजन्सींना या सिरपचा पुरवठा झाला असून त्या एजन्सीकडून बीड शहर, आष्टी, परळी आणि गेवराई येथील मेडिकलपर्यंत तो पोहोचल्याचं समोर आलं आहे.