Ganja worth rupees 30 lakh seized in a swift operation by the Local Crime Branch
sakal
बीड - जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात एका बाजूला पोलीस प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात असताना, खुद्द बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने नवगण राजुरी (ता. जि. बीड) येथे धाड टाकून तब्बल ६० किलो ७० ग्रॅम गांजा जप्त केला आणि ३० लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई अत्यंत कौतुकास्पद आणि धडाकेबाज असली, तरी ज्या बीड ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत हा अवैध साठा बिनदिक्कतपणे फुलत होता, त्यांची अकार्यक्षमता आणि हलगर्जीपणा या कारवाईमुळे चव्हाट्यावर आला आहे.