

Beed Crime News: मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयितांवरील आरोप निश्चितीबाबत १२ डिसेंबरला होणाऱ्या सुनावणीत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुरुवारी (ता. २७) येथील विशेष मकोका न्यायालयात संशयित विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला. घटनेतील फरारी कृष्णा आंधळे सापडत नसल्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचनादेखील तपास यंत्रणांना विशेष मकोका न्यायालयाने दिल्या.