Walmik karad: मस्साजोग सरपंच हत्याकांडात मकोका न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय; वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार
Crime News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनामागचा सूत्रधार म्हणून वाल्मीक कराड याचे नाव स्पष्ट झाले आहे. न्यायालयाने त्याचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला असून, पुढील सुनावणी ४ ऑगस्टला होणार आहे.
बीड : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी विशेष तपास पथकाने न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रात वाल्मीक कराड हाच खुनाचा मुख्य सूत्रधार असल्याचे नमूद केले होते.