

Beed News
esakal
बीड: लग्नाची पत्रिका वाटली... घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. प्रतीक्षा तर लग्नाच्या खरेदीसाठी किती उत्साहात होती. पण साठे चौकातल्या त्या गर्दीत आणि गोंधळात काळ दबा धरून बसला होता. सिग्नल बंद, वाहतुकीचा पत्ता नाही आणि त्याच गोंधळात त्या ट्रकने तिला कायमचं हिरावून नेलं. जर तिथले सिग्नल सुरू असते, तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. साठे चौकातील भीषण अपघातानंतर एका प्रत्यक्षदर्शीने मांडलेली ही व्यथा प्रशासकीय यंत्रणेच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे.