

beed accident vide
esakal
Beed School Bus Accident: शहरातील गयानगर परिसरात शनिवारी स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा आणि शालेय व्यवस्थापनाच्या चुकीच्या नियोजनामुळे एक मोठी दुर्घटना घडली. शाळेच्या बसमधून उतरल्यानंतर रस्ता ओलांडत असताना एका नऊ वर्षीय विद्यार्थिनीला दुचाकीने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे.