

Beed
esakal
बीड: एका तरुणाला जीवघेण्या हल्ल्यातून वाचवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या हॉटेलचालकाचा चाकू भोसकून खून करण्यात आला. ही घटना केज तालुक्यातील टाकळी फाटा येथे घडली. विलास नवनाथ घुले (वय ३०) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे टाकळी गावात संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी आरोपींच्या अटकेसाठी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.