जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Collector Takes Action Against Tehsildar दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला दांडी मारणं तहसीलादाराला भोवलंय. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी कारवाईचा बडगा उगारत तहसीलदाराचा पदभार काढून घेतला आहे.
 Collector Takes Action Against Tehsildar

Collector Takes Action Against Tehsildar

Esakal

Updated on: 

मराठवाड्यासह राज्यात दुष्काळामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालीय. राज्य सरकारकडून दुष्काळाचा आढावा घेतला जात आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला दांडी मारणं तहसीलादाराला भोवलंय. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी कारवाईचा बडगा उगारत तहसीलदाराचा पदभार काढून घेतला आहे. केजचे तहसीलदार भारत गंगावणे यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. पूर्वपरवानगी न घेता मुख्यालय सोडणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दुष्काळी आढावा बैठकीला गैरहजर राहणे गंगावणे यांना चांगलेच महागात पडले. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी त्यांच्याकडील केज तहसीलदार पदाचा पदभार काढून घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com