या जिल्ह्यात अवैध धंद्याचे थैमान..वाचा पोलीसांच्या कारवाईत काय मिळाले

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

  • लॉकडाऊनमध्ये जुगाराचा जोर
  • २४ जुगारी पथकाच्या जाळ्यात
  • १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

परळी वैजनाथ (बीड) : कोरोनाच्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना तालुक्यात मात्र अवैध धंद्यानी थैमान घातले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने धर्मापुरी येथे जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत १२ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. तर यामध्ये परळीसह बीड जिल्हा आणि इतर जिल्ह्यातील २४ प्रतिष्ठित जुगाऱ्यांना अटक केली असल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

याबाबत ग्रामीण पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी (ता.१४) सायंकाळी सहाच्या सुमारास विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत धर्मापुरी येथील किनगाव रोडवर असलेल्या हॉटेलच्या बाजूस असलेल्या शेतात ४ ठिकाणी गोलाकार बसून पत्त्याचा जुगार सुरु असतानाच पथकातील बाळासाहेब फड,श्री घुले,श्री तागर, श्री सुरवसे, पठाण, सावंत,श्री राऊत श्री डोंगरे शेख,शिनगारे, आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी धाड टाकली असता नगदी रोकड व जुगार खेळण्याचे साहित्य, मोबाईलसह इतर साहित्य असा एकूण १२ लाख ८ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
तर सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी दत्ता कुंडलिक सोनवणे, (रा.नांदणी), दत्तात्रय वामनराव धुंधले (रा.परळी), सुरेश अर्जुन बांगर (धारूर), बबलू दत्ता भालेराव (धर्मापुरी), बाबुराव प्रकाश शिनगारे (धारूर), अक्षय फुलचंद मुळे (धारूर), संदीप रामचंद्र काळे (परळी), अतुल अशोक काळे (अंबाजोगाई), शिवाजी हरिभाऊ किर्दत (कुंबेफळ), विशाल सोपानराव गोंदकर- (लातूर), शेख एजाज शेख फरा (अंबाजोगाई), लायक फजल अली सय्यद (लातूर), आनंद जगन्नाथ कदम (अंबाजोगाई), समपात केशव बळवंत (हमालवाडी, परळी), शशिकांत बाबू अवचारे (परळी),सुशील श्यामराव शेळके (धारूर), ज्ञानोबा श्रीपती फड (धर्मापुरी), दुर्गेश जोगिंदर श्रीवास्तव (अंबाजोगाई), सुंदर सुमंत माने (लातूर), ज्ञानेश्वर उर्फ माउली नारायण पतंगे(अंबाजोगाई), तानाजी नामदेव मोरे (लातूर), ओम भरतराव भगात (लातूर), अकबर इब्राहिम बागवान (अंबाजोगाई), व इतर पळून गेलेले ४ ते ५ जण यांच्या विरुद्ध मुंबई जुगार कायदा प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात अली आहे. 

वृक्षलागवडीचा ‘रामपुरी पॅटर्न’ आता संपूर्ण जिल्ह्यात  

दरम्यान लॉकडाउनच्या काळात तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पत्त्याचे जुगार, देशी व गावठी दारू, गांजा आदी नशेच्या पदार्थांचे मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत आहे. दम्यान हे सर्व अवैध धंदे होत असताना स्थानिक पोलीस प्रशासनाला माहित होते कि नाही हे त्यांनाच ठाऊक परंतु यांच्या नाकावर टिचून मात्र अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या पथकाने तालुक्यात अनेक ठिकाणच्या अवैध धंद्यावर धाडी टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Thaman of illegal trade