Beed News: ट्रॅफिकवाले साहेब, जरा लक्ष द्या; वाहतुकीची दुहेरी कोंडी; विकासाच्या नावाखाली रस्ते खोदले, वाहनचालकांची दैना

Impact of Ongoing Road Construction: बीड शहरातील रस्ते खोदकामामुळे वाहतूक दुहेरी कोंडीला बळी, बार्शी नाका व शिवाजी चौकात विशेष हाल. प्रशासनाने सिग्नल व पर्यायी मार्गाची सोय करावी, शालेय बस व रुग्णवाहिका सुरळीत मार्गाने जाण्यासाठी उपाय आवश्यक.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: उन्हाचा कडाका वाढलेला... अंगाची लाहीलाही होत असतानाच समोर वाहनांचा तुफान रांगा आणि कानावर पडणारा हॉर्नचा कर्णकर्कश आवाज... हे चित्र सध्या बीड शहरातील कोणत्याही मुख्य चौकात गेले की अनुभवायला मिळत आहे.

शहराचे सुशोभीकरण आणि विकासकामे सुरू आहेत हे मान्य, पण या कामांच्या नियोजनाअभावी सर्वसामान्यांचा मात्र अक्षरशः श्वास कोंडला जात आहे. कधीकाळी मोकळे वाटणारे रस्ते आता अतिक्रमणे, रस्त्यावरील बांधकाम साहित्य आणि खोदकामामुळे इतके अरुंद झाले आहेत, की दुचाकी काढतानाही कसरत करावी लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com