Beed News: विजेची तार अंगावर पडून बीड तालुक्यात चिमुकलीचा मृत्यू
Electricity Negligence: बीड जिल्ह्यातील नाळवंडी येथे अंगणवाडीकडे जाणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. जीर्ण वीजतारा न बदलल्यामुळे नागरिकांमध्ये महावितरणबद्दल संताप आहे.
बीड : विजेची तार अंगावर पडल्याने अंगणवाडीकडे जाणाऱ्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. नाळवंडी (ता.बीड) येथील लक्ष्मीआई तांड्यावर ही घटना गुरुवारी (ता.१८) सकाळी घडली.