
बीड : अभिषेकाला पाणी आणण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा गोदावरी पात्रात बूडुन मृत्यू
गेवराई - तालुक्यातील निपाणी जवळका या ठिकाणी प्रतिवर्षी जोतीबाची यात्रा गावांत भरत असते. हनुमान जयंती निमित्त हनुमान व जोतीबाला गोदावरी नदीच्या पाण्याने अभिषेक घालण्यात येत आहे. यामुळे गावातील भक्तगण गोदापत्रातून पाणी आणण्यासाठी जात असत यामध्ये पाणी आणण्यासाठी गेलेले दोन तरुण शुक्रवार (ता. 15) एप्रिल रोजी रात्री गेले असता त्यांचा गोदापात्रातील पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना राजापूर येथे घडली आहे.
तालुक्यातील निपाणी जवळका येथील मोहन नाना आतकरे (वय 18) वर्ष, शिवाजी गिन्यानदेव इंगोले (वय 18) वर्ष मूळचा राहणार बेडकोचीवाडी सद्या तो निपाणी जवळका येथे मामाकडे राहत होता, असे मयत तरूणांची नावे असुन गावांत जोतीबाची यात्रा महोत्सव असल्याने गावातील नागरीक हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी हनुमान व जोतिबा देवाला अभिषेक घालण्यासाठी गोदावरी नदीचे पाणी परंपरेनुसार आणत असतात. यावर्षी गावातील नागरीक व तरुण युवक कावड घेवून पाणी आणण्यासाठी तालुक्यातील राजापूर येथील गोदावरीच्या घाटावर शुक्रवार (ता. 15) एप्रिल रोजी गेले होते. यातील मोहन आतकरे व शिवाजी इंगोले हे पाणी घेण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात तोल जावून बुडाले व पाण्याच्यावर आले नाही. शनिवार (ता. 16) एप्रिल रोजी सकाळी त्यांचा शोध घेतला असता ते मृत अवस्थेत पाण्यात आढळून आले. गावकरी यांच्या मध्यस्थिने दोन्ही मृत्यूदेह गोदापात्राच्या बाहेर काढण्यात आले असुन उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मयताला तलवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आनले आहे. सदरील घटनेने निपाणी जवळका येथे शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Beed Two Youths Drowned While Fetching Water For Abhishek
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..