धक्कादायक! महिनाभरात वानरांनी घेतला २५० कुत्र्यांच्या पिलांचा जीव | Beed News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monkey Kills Pappies In Beed District
धक्कादायक! महिनाभरात वानरांनी घेतला २५० कुत्र्यांच्या पिलांचा जीव

धक्कादायक! महिनाभरात वानरांनी घेतला २५० कुत्र्यांच्या पिलांचा जीव

माजलगाव (जि.बीड) : तालुक्यातील लवुळ येथे वानरांनी मागील एक महिनाभरात २५० कुत्र्यांच्या पिलांना मारले असल्याचे लवुळवासीय सांगत असुन याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. शहरापासुन जवळच असलेल्या लवुळ येथे मागील एक ते दीड महिन्यापासून (Beed) तीन मोठ-मोठ्या वानरांचा वावर आहे. हे वानरं गावात असलेल्या कुत्र्यांची पिल्लं उचलून घेऊन जात उंच झाडावर किंवा घरावर जातात व या ठिकाणाहुन या पिल्लांना फेकुन देतात. परिणामी यात पिल्लांचा (Monkey) जागीच मृत्यु होत आहे. आतापर्यंत या वानरांनी २०० ते २५० पेक्षा जास्त कुत्र्यांच्या पिलांचा बळी घेतला असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. दरम्यान गावातील सिताराम नायबळ यांच्या घरी असलेल्या कुत्र्यांच्या पिलाला वानर घेऊन गेले होते.(Beed Updates Monkey Kills Number Of Pappies In Majalgaon)

हेही वाचा: Aurangabad|भरस्त्यात पोलिसाचा दोरीने आवळला गळा, औरंगाबादेत खळबळ

यानंतर पिल्लू विव्हळत असल्याने नायबळ यांनी गच्चीवर जाऊन सोडवण्याचा प्रयत्न करत असतांना वानरांनी त्यांच्यावर धावा केला. यात नायबळ पळत असतांना गच्चीवरून खाली पडले. यात ते जखमी झाले आहेत. याबाबत लवुळ ग्रामपंचायतीने धारूर येथील वनविभागाशी संपर्क साधला परंतु एकदिवस हे अधिकारी आले आणि वापस गेले. यानंतर त्यांनी लवुळकडे पाहिले देखील नसल्याने या वानरांचा वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी लवुळवासीयांनी केली आहे.

Web Title: Beed Updates Monkey Kills Number Of Pappies In Majalgaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Beed
go to top