

Uddhav Thackeray Name Appears In Beed Voter List As Relative Dilip Ghuge Seeks Correction In Draft Electoral Roll
sakal
बीड : औरंगाबाद मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या येथील प्रारूप मतदार यादीत चक्क शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव नातेवाईक म्हणून प्रसिद्ध झाले आहे. त्यावरून राजकीय चर्चा रंगली आहे. याच मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीप हरिभाऊ घुगे (शिवसेना यूबीटी) यांनी विभागीय आयुक्तांच्या ही बाब निदर्शनास आणून चूक दुरुस्तीची मागणी केली आहे.