
बीड : घरातून निघून गेली म्हणून विवाहितेचा खून
बीड : काही दिवसांपूर्वी कोणालाही न सांगता घरातून निघून गेलेली पत्नी घरी आल्यानंतर पती, सासरे, दिराने तिच्या डोक्यात मारहाण करून तिचा खून केल्याची घटना बुधवारी सायंकाळी शेरी बुद्रूक (ता. आष्टी) येथे घडली. या प्रकरणी पती, सासरा व दिराविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.
आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रूक येथील विवाहित महिला ही काही दिवसांपूर्वी कोणाला काही न सांगता घरातून निघून गेली होती. बुधवारी ती घरी आली. याच कारणावरून घरात वादाला सुरुवात झाली. पती, सासरा, दिराने विवाहितेला सायंकाळी मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत तिच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मृत महिलेची बहिण हिच्या फिर्यादीवरून बुधवारी रात्री उशिरा आष्टी पोलिस ठाण्यात आरोपी पती, सासरा, दीर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आला.
पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे करीत आहेत. आरोपी पतीला अटक करण्यात आली. तर सासरा व दीर फरार आहे. दरम्यान, पत्नीचा खून करून पती मिरजगाव, कडा या ठिकाणी पळून लपत होता. हा आरोपी केरूळ येथे लपून बसल्याची माहिती समजताच पोलिस हवालदार बाबासाहेब गर्जे यांनी होमगार्ड महेश जाधव, वाहन चालक पठाण याच्या मदतीने शोध घेत अवघ्या तीन तासात त्याच्या मुसक्या आवळल्या.
Web Title: Beed Women Murder Husband And Father In Law Against Case Filed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..