

Zilla Parishad, Beed
esakal
बीड: आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे पालन झालेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्यास न्यायालयाने निवडणूक आयोगाला परवानगी दिलेली आहे. बीड जिल्हा परिषद व अधिनस्थ ११ पंचायत समित्यांचे आरक्षण देखील ५० टक्क्यांच्या आतच आहे. त्यामुळे बीड जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुका मुदतीत शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. निवडणुक विभागाने निवडणूक आयोगाला आरक्षणाबाबतचा अहवालही पाठविल्याने आयोगाच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.