Ashadhi Wari 2025 : ८८ वर्षांची परंपरा अखंड सुरू; तांब्याच्या भांड्यात वारकऱ्यांची न्याहारी! ‘शके १८५९’ मधील परंपरा
Copper Pot Cooking : बीडमधील कबाड गल्लीतील तांब्याच्या भांड्यांत शिजवलेली डाळ आणि भाकरीची न्याहरी देण्याची ८८ वर्षांची परंपरा आजही सुरू आहे. मराठा पंच मंडळाने सुरू केलेली ही सेवा आता आदर्श मित्रमंडळ अखंडपणे जपत आहे.
बीड : मुक्कामी पालखीचे प्रस्थान होताना सोहळ्यातील वारकऱ्यांना सकाळी तांब्याच्या भांड्यात शिजवलेली डाळ आणि भाकरीची न्याहरी देण्याची परंपरा येथील कबाड गल्लीत अनेक वर्षांपासून आहे.